नवी दिल्ली – दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोने प्रवास केला. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी ( शुक्रवार ) आज मेट्रोने दिल्ली विद्यापीठ गाठले. दिल्ली विद्यापीठाला भेट देण्यासाठी पंतप्रधानांनी आज सकाळी लोककल्याण मार्ग मेट्रो स्टेशन ते राष्ट्रीय राजधानीतील विश्व विद्यालय मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधानांनी हजेरी लावली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi travels by metro to attend centenary celebrations of Delhi University. pic.twitter.com/HOZ6Kb1fjM
— ANI (@ANI) June 30, 2023
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना दिल्ली विद्यापीठाने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. दिल्ली विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नाही, तर एक चळवळ आहे. या विद्यापीठाने प्रत्येक चळवळ जगली आहे, प्रत्येक चळवळीत प्राण फुंकले आहेत. ते म्हणाले की, कोणताही देश, तेथील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था हे त्याच्या कर्तृत्वाचे खरे प्रतीक आहेत.
पंतप्रधानांच्या दिल्ली विद्यापीठाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून एक हजाराहून अधिक निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही निमलष्करी दलाच्या जवानांसह एक हजाराहून अधिक जवान तैनात केले आहेत. त्रिस्तरीय तपासणी व्यवस्थेसह पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
अशात यादरम्यानचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता त्यांना युजर्स ट्रोल करत आहे. पीआर स्टंट म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “तुमच्यासाठी प्रवाशांना थांबवून मेट्रो रिकामी करावी लागली असणार, स्टेशनवर गर्दी तर दिसतच नाही म्हणजे एकूण तुमचा हा स्टंट करायला ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी झाली असणार यात शंका नाही” अशा अनेक कमेंट या पोस्ट खाली दिसत आहेत. तर काहींनी मोदींनी ज्या प्रवाशांशी गप्पा मारल्या ते प्रवासी सुद्धा पैसे देऊन बोलवून आणले असणार असे अंदाज बांधले आहेत.