मुंबई – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या वडिलांचे शुक्रवारी सकाळी चंदीगडमध्ये निधन झाले. पी खुराना हे गेल्या दोन दिवसांपासून फोर्टिस रुग्णालयात दाखल होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5.30 वाजता मनिमाजरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेले काही दिवस ते व्हेंटिलेटरवर होते पण अखेर आज सकाळी व्हेंटिलेटरनेही काम करणे बंद केले. त्यांना 2 दिवस पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. आयुषमानचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ‘आयुषमान आणि अपारशक्तीचे वडील पी. खुराना यांचं मोहालीमध्ये शुक्रवारी सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. आयुष्मान खुराना याने इंडस्ट्रीत काम करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. एवढेच नाही तर त्याच्या वडिलांना हे देखील माहित होते की मुलगा आयुष्मानचे करिअर इंडस्ट्रीमध्ये खास आणि यशस्वी होणार आहे. आयुष्मान खुरानाने वडिलांच्या सांगण्यावरूनच इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.