महावितरणवर ‘टिवटिव’ करणाऱ्या विरोधात तक्रार

उपकार्यकारी अभियंता यांनी केली लोणीकंद पोलीसात तक्रार

वाघोली – महावितरण कंपनीस वारंवार उद्देशून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी विधाने ट्‌विटरवर करीत असल्याने हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांनी आशिष चंगेडीया यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. अधिकारी व कर्मचारी ग्राहकांच्या सेवेसाठी काम करीत असताना चंगेडीया यांच्या वाघोली महावितरण संदर्भातील अनेक आक्षेपार्ह विधानामुळे सर्वांचे मानसिक खच्चीकरण होऊन महावितरणची बदनामी तसेच कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे, असे तक्रारीत नमूद करून कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी वाघोली ग्रामपंचायत कार्यकारिणीने बोगस ट्‌विटर अकाउंटविरोधात लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली असल्यामुळे अनेक नेटीझन्सने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्‍त केली आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सोसायटीधारक वाघोलीकर व काही निवडक सोसायटीधारकांबद्दल केलेल्या आरोपाचे खंडण वाघोली हौसिंग सोसायटीने केले केले आहे. ट्‌विटरवरच महावितरणबाबत आक्षेपार्ह विधाने केली असल्याने एका व्यक्ती विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याने ट्‌विटर युद्ध वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.