पावसाने खराब झालेला कांदा शेतकऱ्यांनी टाकला रस्त्यावर

नगर – गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याने चांगलाच भाव खाल्ला असून कांदा 60 रूपयांच्या पुढे गेला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे कांदाच पाण्यात गेला आहे.तसेच चांगल्या कांद्यालाही पाणी लागल्याने कांदा डागला आहे.तो कांदा बाजारात आणला तरी तो विकत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे.

यंदा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.सततच्या पावसाने हजेरी लावली आहे.सततच्या पावसामुळे जमीनी उपाळल्या आहेत.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला कांदा मात्र पावसामुळे वाया गेला आहे.अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.कधी नव्हे ते सध्या कांद्याला चांगला भाव मिळतआहे. परंतु शेतकऱ्यांकडे कांदाच राहिला नाही आहे

तो पावसाने खराब झाला आहे.डागलेला कांदा बाजारामध्ये विक्रीसाठी आणला तर तो विकला जात नसल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरातील मार्केटमध्ये अशरक्षः शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर टाकून दिला आहे.एकीकडे कांदा शंभरीकडे चालला असताना दुसरीकडे मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.