पुणे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी वेगळ्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील आप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या वेबसाईटमुळे सगळी पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे गावाकडे परतली. मात्र गावी अभ्यास करण्यासाठी हवी ती पुस्तके उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थांची अडचण लक्षात घेत महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी www.abcbook.in या संकेतस्थळाची निर्मीती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनच्या परिक्षेसाठी लागणारे सगळी पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
दरम्यान, या सगळ्या उपक्रमाचा ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या किंवा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा. लॉकडाऊनचा किंवा या महामारीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये. या परिस्थितीचा परिणाम त्याच्या भविष्यावर होऊ नये यासाठी आम्ही ही वेबसाईट तयार केली आहे, असं किरण निंभोरे यांनी सांगितले आहे.
या सगळ्या पुस्तकांची माहिती हवी असल्यात किंवा विकत घ्यायचे असल्यास www.abcbook.in या लिंकवर क्लिक करा.