पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या 26 करोनाबाधित रुग्णांपैकी 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून बरे झालेल्या तिघांना आज घरी सोडण्यात आले.
पिंपळे गुरव, न्हावर, पिंपळे निलख येथील तीन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना आज घरी सोडले. औंध येथील दोन रुग्ण नव्याने करोनाबाधित आढळले आहे. 1 महिला आणि 1 पुरुष रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. पुणे शहरातील 2 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 527 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 143 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.