पुणे : करोनाच्या संसर्गामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध राहणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी बैठकीत केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांची बैठक मंगळवारी (११ ऑगस्ट) पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली. या वेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंडळाच्या पदाधिकाºयांबरोबर संवाद साधला. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, नामदेव चव्हाण, अशोक मोराळे, उपायुक्त मितेश घट्टे, प्रियंका नारनवरे तसेच मानाच्या पाच मंडळांचे पदाधिकारी प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, हर्दिक परदेशी, मयूर परदेशी, नितीन पंडीत, विकास पवार, अनिल सकपाळ, संजीव जावळे तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, महेश दवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
यंदाही मंडळांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी मंडळांनी नियमावलीचे पालन करावे. गर्दी न होऊ देण्यासाठी ऑनलाइन दर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्याावी तसेच ‘श्रीं’चे विसर्जन शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करून करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केले.