मुंबई – ‘सिंघम’ सिनेमातील जयकांत शिक्रे ही व्यक्तिरेखा लोकप्रिय करणारे प्रसिद्ध अभिनेते ‘प्रकाश राज’ यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रकाश राज यांना गंभीर दुखापत झाली आहे. खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना अपघात झाल्याची माहिती दिली होती.
View this post on Instagram
नुकतंच प्रकाश राज यांनी केलेल्या एका ट्विटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमध्ये आपण सर्जरीसाठी हैदाराबादला पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रकाश राज हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
A small fall.. a tiny fracture.. flying to Hyderabad into the safe hands of my friend Dr Guruvareddy for a surgery. I will be fine nothing to worry .. keep me in your thoughts 😊😊😊🤗🤗🤗
— Prakash Raj (@prakashraaj) August 10, 2021
‘मी पडलो आहे. एक छोटासा फ्रॅक्चर आहे. सर्जरीसाठी मी माझा मित्र डॉ. गुरुवरेड्डीकडे हैदराबादला जात आहे. मी लवकरच बरा होईन चिंता करु नका. माझ्यासाठी प्रार्थना करा’ या आशयाचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे.
दरम्यान, त्यांच्या या ट्विटला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यांना दुखापत कशी झाली असा प्रश्न अनेक चाहत्यांनी विचारला आहे. तर एका यूजरने ‘तुम्ही काळजी घ्या.. आशा आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल’ असे म्हटले आहे.