बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने आज, 11 ऑगस्ट रोजी आपला बर्थडे सेलिब्रेट केला. जॅकलीनचा जन्म बहरीन येथे झाला आहे. मिस युनिव्हर्स श्रीलंका विजेती असलेल्या जॅकलीनने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
जॅकलीनला बॉलीवूडमध्ये तब्बल 12 वर्षे झाली आहेत. पंरतु अद्यापही तिचे भारतात घर नाही. तिला भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. जॅकलीन फर्नांडिस सध्या प्रियांका चोप्राच्या घरी भाड्याने राहत आहे. प्रियांका चोप्राच्या मुंबईतील जुहू स्थित “कर्मयोग’ या अपार्टमेंटमध्ये ती राहते. या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी जॅकलीनला भाड्यापोटी मोठी रक्कम मोजावी लागते.
जॅकलीन दरमहा प्रियांकाला 6.78 लाख रुपये भाडे स्वरूपात अदा करत असल्याचे समजते. हे अपार्टमेंट जॅकलीनने तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. या हिशोबाने जॅकलीन तीन वर्षांत प्रियांकाला 2 कोटी 44 लाख रुपये भाडे म्हणून देणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॅकलीन फर्नांडिस या वर्षात खूपच बिझी आहे. जॅकलीनने नुकतेच ‘भूत पुलीस’चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’चे शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय सलमान खानसोबत ‘किक-2’मध्येही ती झळकणार आहे. तसेच काही म्युझिक अलबममध्येही ती काम करत आहे.