India vs Afghanistan 1st T20I (Mohali) :- शिवम दुबेची नाबाद अर्धशतकी खेळी व त्याला अन्य फलंदाजांनी दिलेली साथ यांच्या जोरावर यजमान भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पहिल्या टी-20 मालिकेत 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने तिन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी देताना 1-0 अशी आघाडी घेतली.
अफणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. डावातील दुसऱ्याच चेंडूवर आनवश्यक धाव घेण्याचा प्रयत्नात कर्णधार रोहित शर्मा खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. या वेळी दुसरा सलामीवीर शुभमन गिलने तिलक वर्मासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने आक्रमक फटकेबाजीही केली. मात्र, तो आततायी फटका खेळून 23 धावांवर परतला. त्याने या खेळीत 12 चेंडूत 5 चौकार फटकावले.
त्यानंतर तिलकसह फलंदाजी करण्यासाठी शिवम दुबेला फलंदाजीत बढती देण्यात आली. त्यानेही आपली निवड सार्थ ठरवताना अफलातून फलंदाजी केली. दुसरीकडे स्थिरावलेला तिलक वर्मा 26 धावांवर बाद झाला. त्याने 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 26 धावा केल्या. त्यानंतर दुबेने जीतेश शर्मासह डाव सावरतताना संघाचे शतक फलकावर लावले.
Shivam Dube’s unbeaten half-century guides India to a comfortable victory in the run-chase 👏#INDvAFG 📝: https://t.co/wE4AsAFsxZ pic.twitter.com/F1kb4bs0Mc
— ICC (@ICC) January 11, 2024
जीतेशही चांगला खेळत असताना 31 धावांवर परतला. त्याने या खेळीत 20 चेंडूत 5 चौकार फटकावले. मग रिंकू सिंग दुबेला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला व त्याने दुबेच्या साथीत पाचव्या गड्यासाठी 42 धावांची अखंडीत भागीदारी केली. दरम्यान दुबेने अर्धशतकी पल्ला पार केल्यावर चौकार व षटकार खेचत विजय समिप आणला. या जोडीने संघाचा विजय 18 व्या षटकातच साकार केला. दुबे 40 चेंडूंचा सामना करत 5 चौकार व 2 षटकारांसह 60 धावांवर नाबाद राहिला. तर रिंकू संगने 9 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 16 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने 2 तर अजमतुल्लाह ओमरझाईने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, महंमद नबीसह प्रमुख फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीसह तळात नजीब झद्रानने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या.
#INDvAFG 1st T20 : अफगाणिस्तानचे Team India समोर माफक आव्हान…
भारतीय संघात परतलेला नियमित कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानलापहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र, भारताच्या सुरुवातीच्या षटकांत अर्शदीप सिंग व मुकेश कुमार फारसे प्रभावी ठरले नाहीत. त्याचा लाभ घेत अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहीम झद्रानने दुसरा सलामीवीर रेमनुल्लाह गुरबाजच्या साथीत संघाला अर्धशतकी सलामी दिली. ही जोडी धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच अक्सर पटेलने गुरबाजला 23 धावांवर बाद केले. त्याने या खेळीत 28 चेडूत 2 चौकार व 1 षटकार मारला. पाठोपाठ कर्णधार झद्रानही 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 25 धावा काढून बाद झाला. त्याला शिवम दुबेने बाद केले.
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा गाजवलेल्या रेहमत शाहचा अडसरही पटेलनेच लगेचच दूर केला. त्यानंतर मात्र, अजमतुल्लाह ओमरझाईने महंमद नबीच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. पटेलचा चार षटकांचा स्पेल संल्यावर या जोडीने आक्रमक फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण आणले. मात्र, मुकेश कुमारने परतीच्या स्पेलमध्ये ओमरझाईला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 29 धावा केल्या.
Ultimate Kho Kho Season 2 : गुजरात प्रथमच अंतिम फेरीत; गतविजेत्या ओडीशावर केली मात
मुकेशने याच षटकांत अर्धशतकाकडे वाटचाल करत असलेल्या नबीला 42 धावांवर परत पाठवले. त्याने या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 3 षटकार फटकावले. तळात नजीब झद्रानने आक्रमक फलंदाजी केल्याने त्यांना दीडशतकी धावांचा पल्ला पार करता आला. त्याला करीम जनतनेही सुरेख साथ दिली. झद्रानने 11 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 19 तर करीमने 5 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 9 धावा केल्या. भारताकडून अक्सर पटेल व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शिवम दुबेने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
अफगाणिस्तान – 20 षटकांत 5 बाद 158 धावा. (महंमद नबी 42, अजमतुल्लाह ओमरझाई 29, इब्राहीम झद्रान 25, रेमनुल्लाह गुरबाज 23, नजीब झद्रान नाबाद 19, करीम जनत नाबाद 9, अक्सर पटेल 2-23, मुकेश कुमार 2-33, शिवम दुबे 1-9).
भारत – 17.3 षटकांत 4 बाद 159 धावा. (जीतेश शर्मा 31, तिलक वर्मा 26, शुभमन गिल 23, शिवम दुबे नाबाद 60, रिंकू सिंग नाबाद 16, मुजीब उर रेहमान 2-21, अजमतुल्लाह ओमरझाई 1-33