मुंबई : कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसणाऱ्या मुंबईकरांना महापालिकेकडून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी आजपासून मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे. काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजेन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.
या 244 ठिकाणांची माहिती
महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या 244 ठिकाणांव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोरोना चाचणी मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही 300 पेक्षा अधिक झाली आहे.