महाराजा रणजित सिंग यांच्या पत्नीच्या दागिन्यांचा लिलाव


लंडन:
शीख साम्राज्याचे महाराजा रणजित सिंग यांच्या अंतिम पत्नीच्या दागिन्यांचा लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. एका रत्नजडित दागिन्याला ६० लाख रुपयांचा दर मिळाला.महारानी जिन्दन कौर असे त्यांच्या पत्नीचे नाव होते.

हा दागिना महारानी जिन्दन कौर यांची नातं राजकुमारी बम्बा सदरलैंड हिला वारसा हक्काने मिळाला होता. बोनैहम्स इस्लामिक इंडियन आर्ट सेल्समध्ये या दागिन्याला 62,500 पाउंड म्हणजेच सुमारे ६० लाख रुपये मिळाले.

महारानी जिन्दन कौर यांचा पंजाबमध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यात पुढाकार होता. इंग्रज सैन्याने त्यांना शरण येण्यास भाग पाडले. त्यावेळी लाहोर येथील खजिन्यातून महारानी जिन्दन कौर यांचे ६०० पेक्षा जास्त दागिने जप्त करण्यात आले होते.

या लिलावात १९ व्या शतकातील इतर अनेक वस्तुनीही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. राजा शेर सिंह अट्टारीवाला यांच्या एका चित्रालाही चांगली ७५ लाख रुपयांची किंमत मिळावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.