नवी दिल्ली- दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये “बाबा का ढाबा” नावाच्या दुकानातील आजोबांचा स्टॉल आहे. आजी आजोबांनी मटर पनीर, भात डाळ असं जेवण या स्टॉलवर बनवलं. पण कोरोना काळात कोणी इथे फिरकल सुद्धा नाही. यामुळे भावूक झालेले आजोबा रडताना दिसत होते. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबाचा ढाबावर एकच गर्दी पाहायला मिळाली. आणि दिल्लीकरांनी ढाबावर मटर पनीर खाण्यासाठी गर्दी केली,
‘बाबा का ढाबा’ जाइए, लज़ीज़ खाने का लुत्फ़ उठाइए जिससे इनकी मदद हो सके.👌👍 pic.twitter.com/ZYgdjq24uV
— Awanish Sharan (@AwanishSharan) October 7, 2020
गौरव वासन नावाच्या एका यूजरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला होता. ट्वीटरवर तब्ब्ल २.३ मिलियनवेळा हा व्हिडीओ पाहीला गेला. मात्र आता “बाबा का ढाबा”ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या आणि त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
Delhi: Kanta Prasad, owner of #BabaKaDhaba, files Police complaint against Gaurav Wasan -who first shot his video & posted it- for allegedly misappropriating funds raised to help his wife & him. He alleges cheating, mischief, criminal breach of trust, criminal conspiracy by Wasan pic.twitter.com/f1IGxwcB2e
— ANI (@ANI) November 2, 2020
“बाबा का ढाबा”चे मालक कांता प्रसाद यांनी ट्यूबर गौरव वासन विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये गौरवने अफरातफर केली असल्याचं म्हटलं जात आहे.
गौरव वासन याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. आणि आता याच बाबांनी गौरव वासन विरोधात तक्रार दाखल केली आहे.