Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही 5 टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. | chhatrapati shivaji maharaj park
2019 साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ 6 जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून 2 जून रोजी सात टप्पे संपणार आहेत. | Lok Sabha Election 2024
अश्यातच, आता निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’ चा नारा दिला आहे. त्यादृष्टीने देशभरात भाजप पक्ष कामाला लागला आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. | chhatrapati shivaji maharaj park | Lok Sabha Election 2024
मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राजकीय सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अर्ज केले असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांचे मुंबई महापालिकेकडे राजकीय सभा आणि मेळावे घेण्यास परवानगी देण्यासंदर्भात अर्ज करण्यात आले आहे.
यामध्ये 17 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मिळावं यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज पालिकेकडे देण्यात आला आहे. तर 16, 19 आणि 21 एप्रिलला मैदान मिळवण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज पालिकेकडे गेलाय. पुन्हा शिंदे गटाचे 3, 5 आणि 7 मे रोजी प्रचार सभांसाठी शिंदे गटाने पालिकेकडे अर्ज केलाय.
मनसे, ठाकरे गट, शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील मुंबई महापालिकेकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मिळावं म्हणून अर्ज देण्यात आलाय. 22, 24 आणि 27 एप्रिल रोजी प्रचार सभा घेण्यास परवानगी संदर्भात अजित पवार गटाकडून अर्ज देण्यात आलाय. | Lok Sabha Election 2024
शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे अर्ज :
शिंदे गट- 16 एप्रिल, 19 एप्रिल, 21 एप्रिल, 3 मे, 5 मे, 7 मे
अजित पवार गट- 22 एप्रिल, 24 एप्रिल, 27 एप्रिल
भाजप- 23 एप्रिल, 26 एप्रिल, 28 एप्रिल
मनसे- 17 मे
ठाकरे गट- 17 मे