जनतेला येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करता काही निवडक व्यवसायांना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही मान्यता 20 एप्रिलपासून देण्यात येईल. मात्र त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि अरोग्य नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक राहणार आहे. अर्थव्यवस्था सुरू करण्याचे हे पहिले पाऊल असल्याचे मानले जात आहे.
मान्यता मिळालेली निवडक क्षेत्रे
ई कॉमर्स, किरकोळ-किराणा दुकाने
नव्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी सुरळीत राहण्यासाठी उत्पादन, घाऊक विक्रेते आणि स्थानिक विक्रेत्यांची दुकाने सुरू राहतील. त्यांच्यावर वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील. दरम्यान, फ्लिपकार्ट समूहाने या सवलतींचे स्वागत केले आहे. धान्य, भूसार, फळ आणि भाजीपाला विक्रत्यांवरील बंधनेही हटवण्यात आली आहेत. सर्व प्रकारच्या मालवाहतुकीवरचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
आयटी उद्योग, हार्डवेअर आणि उत्पादन
आयटी उद्योगांना 50 टक्के कर्मचाऱ्यांवर आपले काम सुरू करता येईल. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून वर्क फ्रॉम होम पध्दतीने काम करणाऱ्या या क्षेत्राला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आयटी हार्डवेअर उत्पादनासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे मोबाईल, संगणक लॅपटॉप यासारख्या वस्तूंची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दिलासादायक आहे. या खेरीज, सेझ, औद्योगिक वसाहती येथे उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कृषीक्षेत्र
कृषीक्षेत्रातील सर्व व्वहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूरांना त्यांचे काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कृषी उत्पादनांच्या सर्व संस्था खुल्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात खत आणि शेती यंत्रांचा समावेश आहे. चहा, कॉफी आणि रबर लागवड क्षेत्रांना 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरू करता येईल.
आर्थिक क्षेत्र
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि त्यांनी नियमित केलेल्या एनपीसीआय, सीसीआय सारख्या आर्थिक बाजारपेठ, पेमेंट सिस्टिम ऑपरेटर, बॅंकांच्या शाखा आणि एटीएम सुरू राहतील.
शिक्षण
ऑनलाईन शिक्षण आणि दूर शिक्षणाला चालना देण्यात येईल. मात्र शैक्षणिक संस्था बंद राहतील. संस्थांनी शैक्षणिक वेळापत्रक सांभाळण्यासाठी ऑनलाईन शिकवणे अपेक्षित आहे.
आरोग्य पूर्ण वातावरण
या सर्व संस्थांना टेम्परेचर स्कॅनिंग आणि सॅनिटायझरच्या पुरवठ्यासह सर्व आरोग्य पूर्ण सुविधा देणे गरजे आहे. दोन्ही पाळ्यांमध्ये एक तासाचा अवधी असावा. सामुहीक पृष्ठभागाची सातत्यपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. आरोग्याच्या सुचना वेळोवेळी देण्यात याव्यात. या शिवाय इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोटार मेकॅनिक आणि सुतारांना त्यांचे काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.