नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा रद्दही झाल्या आहेत. ज्या स्पर्धा पुढील काळात होतील अशी अपेक्षा आहे त्यात सहभागी होणार असलेल्या खेळाडूंना एक स्पर्धा आयोजित करत ऑनलाइन सराव दिला जात आहे. देशातील नेमबाजांना ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून चांगला सराव मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आता अनेक खेळाडूंनी आपल्या घरातच रेंज तयार केली आहे. येत्या 15 एप्रिलला प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यासाठी काही प्रमुख खेळाडू आपल्या घराचा उपयोग नेमबाजी रेंजसारखा करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले लक्ष्य, मोबाइल फोन आणि इंटरनेटचा वापर करून ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.