मुंबई – जेष्ठ अभिनेते ‘अमोल पालेकर’ लवकरच रंगभूमीर पुनरागम करणार आहे. गोलमाल, छोटीसी बात आणि चित्तचोर सारख्या चित्रपटातील अभिनयाने अमोल पालेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ते तब्ब्ल 25 वर्षानंतर कमबॅक करत आहेत.
दरम्यान, अमोल पालेकर हिंदी नाटक ‘कसूर’ मधून रंगभूमीवर कमबॅक करत असून, या नाटकात अमोल हे निवृत्त एसीपीची भूमिका साकारणार आहेत.
येत्या 24 नोव्हेंबर रोजी अमोल पालेकर हे 74 वर्षांचे होतील. आणि याच दिवशी मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये कसूर नाटकाचे प्रीमियर होणार आहे.
अमोल पालेकर यांनी 1971 साली मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर ते बॉलिवूडकडे वळले आणि 1974 साली बासु चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ या चित्रपटात त्यांनी काम केले.