दैनिक प्रभातची डायरी वकीलांसाठी महत्वपुर्ण : ऍड.नितीन पोळ
कोपरगाव : दैनिक प्रभात ची वकिलांसाठी तयार केलेली डायरी वकील व्यवसायाकरिता अत्यंत फायद्याची असून त्यामधील छापलेला मजकूर अभ्यासपूर्ण आहे त्याचा फायदा वकीलाने दैनंदिन कामकाजात होत आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून दैनिक प्रभात नही वकिलांसाठी तयार केलेली ही दैनंदिन डायरी अत्यंत महत्वपूर्ण तसेच अभ्यासपूर्ण आहे याचा फायदा वकिलांना होत असतो या डायरी मुळे वकिलांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येत आहे.
अनेक वेळा न्यायालयाच्या कामकाजामध्ये न्यायाधीशांसमोर अडचण निर्माण होते एखादा मुद्दा पुस्तकातून पाहण्याऐवजी प्रभात डायरीमधून त्वरित निदर्शनात येतो. त्यामुळे कमी वेळेमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रभात डायरीचा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव येथील विधिज्ञ एडवोकेट नितीन पोळ यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही प्रभातचा वाचक तर आहोतच दैनिक वर्तमानपत्रांमध्ये एक वेगळा दर्जा प्रभातचा आहे सोबतच त्यांचीही दैनंदिन डायरी आमच्यासाठी वकिलीच्या कामकाजासाठी तितकीच फायद्याची आहे. असे म्हणत दैनिक प्रभात परिवाराचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
2020 साठी वर्षभराच्या कामकाजाची दैनंदिन माहिती नोंद करण्यासाठी त्यासोबतच कोणत्या कामाला कोणत्या टिपरीची आवश्यकता आहे वकिलाच्या दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या टिपण्या दैनिक प्रभात च्या दैनंदिन डायरीमध्ये असल्याने त्याचा फायदा मला गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. हे अति महत्वपूर्ण डायरी वकिलांना मोफत दिली जाते ही बाब कौतुकाची आहे अशी प्रतिक्रिया ऍड.मनोहर येवले यांनी व्यक्त केली आहे. दैनिक प्रभात च्या या महत्वपुर्ण अनोख्या डायरीचे अनेक वकिलांनी स्वागत करीत दैनिक प्रभात परिवाराचे मनापासून आभार मानत आहेत.