राहुरी, (प्रतिनिधी): – आई- वडिलांना मारण्याची धमकी देऊन काॅलेज तरुणीवर अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तरुणीच्या फिर्यादीवरून ओम फुगारे या काॅलेज तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले.
या घटनेतील तरुणी ही एका कॉलेजमध्ये १४ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असताना ओम फुगारे (रा. राहुरी खुर्द) या तरुणाशी ओळख होऊन मैत्री झाली.
सप्टेंबरमध्ये लॉजवर ओम फुगारे याने अत्याचार केला. पीडित मुलीने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी पोलीस पथकाने आरोपी ओम फुगारे याला ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.