नगर (प्रतिनिधी) – पालकमंत्र्यांनी काल चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून मोकाट फिरणार्यांवर कारवाई केली.
वीकेंड लॉकडाउन असल्याने आज रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र, बसस्थानक, मार्केटयार्ड परिसरात थोडीसी वर्दळ होती. जिल्हाधिकार्यांनी काल रात्री आदेश काढून जनता कर्फ्यू जारी केला. त्यात भाजीपाला,फळे, दूध विकेत्यांना सकाळी काही काळ फिरून विक्री करण्यास मुभा दिली आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज रस्त्यावर उतरून लोकांना सूचना केल्या. तसेच निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर त्यांनी कारवाई केली.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी माळीवाडा बसस्थानक, कापड बाजार, मार्केटयार्ड आदी परिसरात फौज-फाट्यासह जाऊन कारवाई केली. उद्या पासून चौका-चौकात पोलीस पथक तैनात राहणार आहे.