उरण येथील प्लॅंट बिघाडाचा परिणाम नाही
पुणे – उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्लॅंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी सीएनजी पुरवठा खंडीत झाला. पण, पुण्यात मात्र याचा कुठलाही परिणाम शनिवारी जाणवला नाही.पुण्यात सगळे सीएनजी पंप सुरळीत सुरू होते.
उरण येथील प्लॅंटमध्ये बिघाड झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली असून मुंबईतील सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला. तर, पुण्यातील सीएनजी पंपांना मुंबई येथूनच गॅसपुरवठा होतो. पण, या तांत्रिक अडचणीचा फारसा परिणाम पुण्यात जाणवला नाही.
याबाबत संबंधितांशी चर्चा केली असता, “मुंबई आणि पुण्याची सीएनजी पुरविण्यात येणारी पाइपलाइन स्वतंत्र आहे. तसेच प्लॅंटही वेगळे आहे. त्यामुळे पुण्याचा सीएनजी पुरवठा शनिवारी सुरळीत होता शिवाय सर्व पंप सुरू होते,’ अशी माहिती एमएनजीएलचे व्यवस्थापक संतोष सोनटक्के यांनी दिली.