महापोर्टल बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबई: स्पर्धा परीक्षा करण्याकडे राज्यातील तरुणांनाच मोठा ओघ असल्याचे पाहायला मिळते. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर तरुण प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. या महापोर्टलवरील प्रक्रियेसंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी मुख्यमंत्र्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती केली आहे. पोर्टल संदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर आल्या असल्याने, आम्ही नवीन पोर्टल सुरु करण्याची विनंती केली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. काही राज्यांमध्ये त्यासाठी मंत्रालयात वेगळा विभाग आहे. त्यामुळे राज्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.