पुणे – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त पुण्यातील फरासखाना मजूरअड्डा येथील क्रांतिकारक शहिद पांडुरंग भास्कर कर्णिक यांच्या स्मारक येथील स्वच्छता आज पुणे नवरात्रौ महोत्सवतर्फे करण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी ही सफाई केली. प्रारंभी शहिद भास्कर कर्णिक यांचा स्मृतिस्तंभ पाण्याने स्वच्छ धुवण्यात आला तसेच सारा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर बागुल यांच्या हस्ते पुष्पचक्र व पुष्प अर्पण करण्यात आले व सर्व उपस्थितांनी फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
बागुल म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे 25 कार्यक्रम वर्षभर पुणे महानगरपालिकेतर्फे केले जावेत असा प्रस्ताव मी दिला व तो संमतही झाला आहे. त्याचा सुरवातीचाच कार्यक्रम क्रांतिकारक भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे हा असून अन्य अनेक कार्यक्रम आहेत.
आज गांधी जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला आम्ही पुणे नवरात्रौ महोत्सवाने सुरुवात केली आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे खजिनदार नंदकुमार बानगुडे, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी,सदस्य विलास रत्नपारखी,महेश ढवळे,विकी खन्ना, सागर आरोळे,इम्तियाज तांबोळी,समीर शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.