सातारा, (प्रतिनिधी) – जुन्या जमान्यातील साताऱ्याचे सुपुत्र असणारे व ज्येष्ठ शास्त्रीय ग्राहक पंडित प्रभाकर पंत जोशी (वय 91) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक मोठे पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
ते मूळचे खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील होते. साताऱ्यापासून गेली काही वर्षे ते दूर असले तरी मातृभूमीशी त्यांची नाळ कायम होती. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे महान गायक जगन्नाथ बुवा पंढरपूरकर यांचे शिष्य पंडित प्रभाकर पंत यांची उत्कृष्ट शास्त्रीय गायक म्हणून ओळख होती. शुद्ध गायकी गायकी मधल्या अनेक दमदार चिजा आणि संगीतातील बारकावे हे प्रभाकर बुवा गुरु पंढरपूरकर यांच्याकडून शिकले. अनेक रागातील शुद्ध असता यंत्रे गायकीसह प्रभाकर पंतांना वारशाने मिळाले.
सुमारे पाच दशके त्यांनी शास्त्रीय गायनाची मुशाफिरी केली. डॉ.शोभा आगाशे, सौ. पुरोहित, साखवळकर, सौ. शकुंतलाबाई जोशी, उषा धांदरफळे, संजय दीक्षित, दीपक खांडके, राजेंद्र आफळे, चंद्रकांत शिंदे, वनिता कुंभार, डोईफोडे इत्यादी शिष्यवर्ग त्यांनी निर्माण केला.
हार्मोनियम वाजवणे आणि अत्यंत सुरेल तानपुरे जुळवणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. ताल आणि लयीचा पक्केपणा, सुरेल आलाप, तिलवाडा झुमरा यासारखे ताल आणि निर्दोष राग स्वरूप ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती.