संदीप सोनवणे
शिर्डी – सा गेल्या दोन महिन्यापासून सुरक्षा विभागाने साई भक्तांचे चोरी गेलेले दागिने व पैसे तात्काळ मिळून देऊन कौतुकास्पद काम केले आहे. अशाच प्रकारे सुरक्षा विभागाने साई भक्तांसाठी कामकाज करावे, अशी भावना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी व्यक्त केली.
शिर्डी येथील साई संगम प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप सोनवणे, उद्योजक संजय गव्हाणे यांच्या उपस्थितीत साईबाबा संस्थानचे मंदिर सुरक्षा अधिकारी, पोलीस निरीक्षक रोहीदास माळी यांचा सत्कार करण्यात आला. साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे चोरी गेलेले सोने व रोख रक्कम मुद्देमाल भाविकांना परत देण्यासाठी दोन महिन्यांत चांगली कामगिरी करून ९५० सुरक्षारक्षक व दोन साध्या वेषातील पथकाच्या माध्यमातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी कुठलेही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे नियोजन करत आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानचा नावलौकिक वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत संदीप सोनवणे यांनी व्यक्त केले. पोलीस निरीक्षक रोहिदास माळी म्हणाले की, सर्व सुरक्षारक्षकांनी एकजुटीने चांगली सेवा देण्यासाठी केलेला संकल्प व टीमवर्क यामुळे त्रिसदस्यीय समितीच्या मार्गदर्शनाखाली साईभक्तांना चांगली सुरक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तुरकणे, रविंद्र तुरकणे ,गणपत भागवत, नवनाथ शेळके, प्रदिप पठारे ,योगेश रसाळ,विलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.