निघोज – निघोज येथील खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी निमित्ताने लंके भावकी व खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने शनिवार दि.१६ पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लंके भावकी व खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली आहे.
कैलास महाराज येवले , तुळशीराम महाराज सरकटे, भागवत महाराज साळुंके यांची कीर्तने ठेवण्यात आली आहे. सोमवार दि.१८ रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजता भागवत महाराज साळुंके यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री नऊ ते अकरा वाजता जागर श्रीराम भजनी मंडळ निघोज, मळगंगा भजनी मंडळ बोदगेवाडी तसेच सोमवार दि. १८ रोजी रात्री नऊ ते अकरा यावेळेत बेल्हे येथील कलगीवाले शाहीर विजय गोरक्ष शिंदे जागरण गोंधळ आणि भराड पार्टी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, सात ते नऊ कीर्तन, ९ ते १० भोजन समारंभ ठेवण्यात आला आहे. यासाठी जय मल्हार मित्र मंडळ निघोज तसेच भावकीतील ग्रामस्थ लोकसहभागातून अन्नदान करणार आहेत.