पुणे – वडगाव शेरी स.नं १३ येथील हॉटेल एलरो यांनी टेरेस वरील अनधिकृत शेड वर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण विभागा मार्फत कारवाई करण्यात आली. या ठिकाणी हॉटेल व्यवसायही चालवला जात होता. त्यांना दोन अॉगस्ट २०२२ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्याला कोणतेच उत्तर संबंधितांकडून देण्यात आले नाही. तसेच हे अनधिकृत शेड काढूनही घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करून सुमारे १४ हजार चौ. फुटाचे कच्चे बांधकाम काढून टाकण्यात आले.
सहा गॅस कटर,१२ बिगारी, आठ महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान समवेत पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेकडून कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा बांधकाम निरीक्षक विष्णू तौरश्री. पंकज दोंदे, योगेश गुरव हे उपस्थित होते. या आधीही याठिकाणी दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.