‘नागरिकांनो, आम्ही असल्यास सुरक्षित असल्याचे समजा’

पुणे – सांगली, कोल्हापूरमध्ये जीवितहानीसोबतच मोठे नुकसान झाले. एनडीआरएफ टीम तेथे 15 दिवस कार्यरत होती. सुमारे 35 हजार नागरिकांना आम्ही सुरक्षित जागी हलविले. गणपती हे विघ्नहर्ता आहेत, त्यांची कृपा संपूर्ण देशावर राहू देत. आम्हांला प्रशिक्षण मिळत असले, तरी देखील लोकांचा विश्‍वास आम्हाला शक्ती देतो. गणेशाची कृपा असेल, तर संकट येणार नाही. आम्ही असल्याने नागरिकांनी सुरक्षित असल्याचे समजावे, असे एनडीआरएफचे डेप्युटी कमांडन्ट अलोककुमार यांनी म्हणाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात “एनडीआरएफ’च्या जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्‍वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. “एनडीआरएफ’च्या जवानांनी गणरायाला अभिषेक करण्यासोबत आरती देखील केली. गणरायाला यावेळी लाडूंचा भोग चढविण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)