नागरिकांनो, प्राणी-पक्षी तस्करीची माहिती द्या

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे आवाहन : विशेष कक्षाचीही केली स्थापना

पुणे – राज्यातील पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीनएचएस) विविध प्रयत्न केले जात असून, आता विशेष सेलची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांना पक्ष्यांच्या तस्करीबाबत माहिती देता येणार असून, तस्करी रोखण्यासाठी कारवाईदेखील केली जाणार आहे.

पक्ष्यांच्या संवर्धन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेली “बीनएचएस’ संस्था ही वनविभागाच्या सहकार्याने पर्यावरण क्षेत्रात काम करते. राज्यातील पक्ष्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे संस्थेच्या पाहणीतून आढळून आले आहे. यामध्ये तितर, पोपट, महाधनेश यासारख्या पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

विशेष म्हणजे, पक्षी तस्करीसाठी तंत्रज्ञान माहिती असलेली, सुशिक्षित नागरिकांची टोळी सक्रिय असून तिचे एक मोठे जाळे पसरले असल्याचेही संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे. पक्षी तस्करीचा ही संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी “बीएनएचएस’ने एक पाऊल पुढे टाकले असून, ही तस्करी रोखण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एक विशेष सेल उभारला आहे. या सेलच्या माध्यमातून तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

राज्यातील नागरिकांना पक्ष्यांच्या तस्करीची माहिती देता यावी, यासाठी लवकरच एक हेल्पलाइइन नंबरदेखील जाहीर करणार असून, यामाध्यमातून वन्य प्राणी-पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते अबरार अहमद यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.