खासदार संजय राऊत यांचे आणखी एक हटके ट्विट
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते आजपर्यंत शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे आक्रमक भूमिका घेताना सर्वांना पहायला मिळाले. भाजपसोबतच्या तंट्यापासून ते राज्यात महाविकास आघाडीची घडी बसेपर्यंत संजय राऊत हे स्पष्ट भूमिका मांडताना दिसले. त्यातही त्यांच्या रडारवर त्यांचाच मागील 25 वर्षापासून असणारा मित्रपक्ष भाजपच होता. गेल्या महिनाभरापासून ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधणाऱ्या राऊत यांचे ट्विट हल्ले अजूनही सुरूच आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी आणखी एक ट्विट करत विरोधकांना शांत राहण्याचा सल्ला दिला.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून शेर पोस्ट करत विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी नियम आणि संविधानानुसार कामकाज होईल, यासाठी आग्रही राहिल, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच राऊत यांनी ट्विट केले आहे.