अनेक रिऍलिटी टीव्ही शोजवर तुम्ही जजच्या भूमिकेत बसलेल्या फिल्ममेकर-कोरिओग्राफर फराह खानचा हटके अंदाज पहिला असेल. फराह आपल्या बेबाक वक्तव्यांसाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. शोमध्ये सहभाग घेण्यासाठी आलेल्यांसोबतच अनेक बड्या-बड्या स्टार्सची फिरकी घेताना तुम्ही फराहला पाहिलं असेल. अशातच आता फराहने कतरीना कैफची अशीच फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.
त्याच झालं असं की फराह खान व विकी कौशल सध्या क्रुएशिया येथे एका प्रोजेक्ट्साठी शूट करत आहेत. कामासोबतच दोघे भटकंती देखील करताना दिसतायेत. दोघांना यावेळी फोटो शूट करण्याचा मोह देखील आवरला नाही. मात्र या फोटोंचा वापर करून नुकतीच विकीसोबत विवाह बंधनात अडकलेल्या कतरीनाची फिरकी घेण्याचा प्लॅन फराहने आखला.
मग काय फराहने विकिसोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अपडेट केला. या फोटोला तिने ‘सॉरी कतरीना त्याला आता कोणीतरी दुसरी मिळाली आहे.’ असं कॅप्शन देत कतरिनाला टॅग केलं. हजरजबाबी असलेल्या कतरिनाने देखील लगेच ही स्टोरी आपल्या प्रोफाईलवर ठेवत तुम्हाला अनुमती आहे असं कॅप्शन दिलं.