मुंबई – सनी देओलच्या ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते, कारण या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच थरार निर्माण केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.तसेच चित्रपटात सनी देओल आणि दुलकर सलमान यांच्याशिवाय पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
ट्रेलर पाहून असे दिसते की ही कथा एका सिरीयल किलरची आहे. ट्रेलरमध्ये मारेकऱ्याचे आणि जुन्या सिनेमाचे काहीतरी कनेक्शन दाखवल्याचे समजते. ज्याप्रमाणे एखादा फिल्म क्रिटिक चित्रपटाला स्टार देतो त्याप्रमाणे हा मारेकरी देखील मारणाऱ्याला स्टार देत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या चित्रपटात सनी देओल तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर पूजा भट्टही दमदार भूमिकेत आहे. श्रेया आणि दुलकर सलमानबद्दल सस्पेन्स निर्माण झाला आहे. ट्रेलर पाहून या दोघांपैकी एक सीरियल किलर असल्याचे दिसते.
अमिताभ बच्चन म्युजिक कम्पोजर झाले
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन म्युजिक कम्पोजर झाले आहेत. होय, हे खरे आहे. आर बाल्की यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की त्यांनी चित्रपटाची कथा अमिताभ यांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पियानोवर एक धून वाजवली. आर बाल्की यांना ही धून आवडली आणि त्यांनी अमिताभ यांना विचारले की ते त्यांच्या चित्रपटात वापरू शकतात का? आणि अमिताभ बच्चन यांनी होकार दिला.