नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पावरील चिनी कामगारांना मारहाण

काठमांडू: नेपाळमधील एका जलविद्युत प्रकल्पावर कार्यरत असलेल्या चिनी कामगारांना नेपाळमधील स्थानिक नेपाळी कामगारांनी चांगलाच चोप दिला आहे. या चिनी कामगारांनी पुन्हा चीनला निघून जावे अशी मागणीही नेपाळी कामगारांकडून करण्यात येत आहे.

लामजुंग येथील जलविद्युत प्रकल्पावर ही घटना घडली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नेपाळमध्ये सध्या देशव्याप्ती लॉकडाऊन आहे. त्यातच लामजुंग येथील मारस्यांगी ग्रामीण महापालिकेच्या हद्दीतल्या न्यादी हायड्रोपॉवर प्रोजेक्‍टवर बांधकामाचे साहित्य घेऊन चिनी कंपन्यांचे ट्रक आले असता स्थानिक नागरीक आणि नेपाळी कामकारांनी त्यांना विरोध केला. हे चिनी कामगार नुकतेच चीनमधून आलेले असल्याने त्यांना गावात येऊ दिले जाऊ नये, अशी मागणी स्थानिक करत होते. त्या ट्रकना रोखण्यासाठी गावाबाहेरच्या रस्त्यांवर अडथळेही उभारण्यात आले होते. हे अडथळे हटवून दोन ट्रकनी गावात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर प्रक्षुब्ध स्थानिक युवकांनी आक्रमकतेने या चिनी कामगारांवर हल्ला केला आणि त्यांना चोप दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.