बीजिंग – पाकिस्तानच्या हवाई संरक्षण विषयक गरजा पूर्ण करणे चीनसाठी अशक्य बनले आहे. चीननेच पाकिस्तानला पुरवलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यंत्रणा यामुळे विकलांग बनायला लागली आहे. चीनकडून क्षेपणास्त्रांच्या सुट्या भागांचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे या प्रणालीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे, असे वृत्त एका भू-राजकीय विश्लेषण करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. जर ही स्थिती कायम राहिली तर पाकिस्तानला हवाई संरक्षण करणे अशक्यच होऊ शकेल, असेही या संकेतस्थळाने म्हटले आहे.
पाकिस्तानने 2017 मध्ये चीनकडून एचक्यू-16 (एलवाय-80) ही जमिनीवरून हवेत मारा करणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे खरेदी केली होती. ही क्षेपणास्त्रे सरळ उभी करूनही हवेत मारा केली जाऊ शकतात. तसेच विपरीत हवामानाच्या स्थितीमध्येही त्यांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र या प्रणालीमध्ये तब्बल 477 दोष आढळून आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणापुढील हे संकट दूर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र त्याचा काही उपयोग होऊ शकलेला नाही.
जागतिक T20 लीगमध्ये ‘IPL’ची मक्तेदारी धोकादायक, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने व्यक्त केले मत
गेल्या वर्षी मे-जूनमध्ये चिनी तज्ज्ञांचे पथक या दोषांचे निवारण करण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. मात्र त्याचाही विशेष परिणाम झाला नाही. ऑक्टोबरमध्ये दुसरी टीम पाकिस्तानला गेली पण त्यांनाही हे दोष दूर करता आले नाहीत. या क्षेपणास्त्रांचे सुटे भाग बदलणे आवश्यक होते आणि हे भाग चीनकडे उपलब्ध नाहीत. पाकिस्तानच्या हालाखीच्या आर्थिक स्थितीमुळे नियोजन केल्याप्रमाणे नवीन 6 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणे पाकिस्तानला शक्यच नाही.
Census of Bangladesh : बांगलादेशात पुरुषांपेक्षा महिला अधिक; हिंदूंची टक्केवारी….