ढाका – बांगलादेशात झालेल्या जनगणनेमध्ये देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्सांच्या आधारे देशात 8.17 कोटी पुरुष तर 8.33 कोटी महिला असल्याचे समोर आले आहे.
देशाची एकूण लोकसंख्या 2011 मध्ये 14.4 कोटी होती ती 2022 मध्ये 16.51 कोटी झाली असल्याचे बांग्लादेश सांख्यिकी ब्युरोने म्हटले आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2011 मध्ये 1.37 टक्के होता. तो आता 1.22 इतका कमी झाला सल्याचेही या जनगणनेमध्ये निष्पन्न झाले आहे.
हिंदूंची टक्केवारी 7.95 टक्क्यांवर घसरली. बौद्ध लोकसंख्या एकूण 0.61 टक्क्यांवर आणि ख्रिश्चन लोकसंख्याही 0.30 टक्क्यांवर आली आहे. मात्र मुस्लिम लोकसंख्या 91.4 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.