China Patriotic Education Law : आंतरराष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत चीनची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे. मात्र जगात आपला वाचक निर्माण करणाऱ्या चीनला आपल्याच देशातील लोकांना आपल्याच देशावर प्रेम कसे करावे ही सांगण्याची वेळ आली आहे. कारण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यासाठी देशात कडक पावले उचलली आहेत.
चीनला चहुबाजूने संकटाने घेरले आहे. कधी देशात कमी होत चाललेल्या रोजगारसंख्येच्या विरोधात तरुण वर्ग आंदोलन करत आहे तर कधी अर्थव्यवस्थेच्या मंदीमुळे देशातील व्यापारी परदेशाकडे वळत आहेत. चीनचे तैवानशी असलेले वैर सर्वश्रुत आहे. तैवानमधील आगामी निवडणुकांमुळेही जिनपिंग यांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, चीनमधील जनता आता देशभक्तीला प्राधान्य देत नसल्याचे चीन सरकारला वाटते. लोकांमध्ये देशाप्रती देशभक्तीची भावना नाही, असे सरकारचे मत आहे, म्हणूनच जिनपिंग यांच्या सरकारने देशभक्तीपर शिक्षण कायदा लागू केला आहे. पुढील आठवड्यापासून चीनमध्ये हा कायदा लागू होणार आहे.
देशभक्तीपर शिक्षण कायद्याचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता वाढवणे हा आहे. या कायद्यानुसार लहान मुलांपासून ते कामगार आणि सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षावर विश्वास दाखवावा लागेल. मुलांच्या शाळांमधील अभ्यासक्रमात देशभक्ती कायदाही जोडला जाणार आहे.