बीजिंग
जगातील सर्वात मोठा साम्राज्यवादी देश म्हणून चीनकडे पाहिले जाते आपल्या शेजारी राष्ट्रांची जमीन हडप करण्यामध्ये चीन कुप्रसिद्ध आहेच आता चीनपासून लांब असलेल्या अनेक देशांमधील जमीन खरेदी करण्याकडे चीनने लक्ष केंद्रित केले असून अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये चिनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खरेदी केली आहे.
अमेरिकेमध्ये चीनच्या नागरिकांनी तब्बल चार लाख एकर शेत जमीन खरेदी केली असून त्याची किंमत पंधरा हजार कोटी रुपये एवढी आहे गेली अनेक वर्षे चीनच्या नागरिकांनी जमीन खरेदी करायचा सपाटा चालू ठेवला आहे पण गेल्या दोन वर्षांमध्ये त्याचा वेग वाढला असून 2021 नंतर तब्बल दोन लाख एकर शेतजमिनीची खरेदी करण्यात आली आहे याची दखल अमेरिकेतील विविध राज्य सरकारांनी घेतली असून फ्लोरिडा सरकारने तर कायदा करून चीनच्या नागरिकांना त्या राज्यामध्ये जमीन खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेतील इतर राज्य सुद्धा याच प्रकारचा विचार करत आहेत अमेरिकाशिवाय आशियातील काही देशांमध्ये चीनच्या नागरिकांतर्फे खरेदी सुरू आहे तज्ज्ञांच्या मते चीनच्या या शेतजमीन खरेदीमागे निश्चितच एक रणनीती आहे अमेरिकेत नॉर्थ डाकोटा प्रांतामध्ये ज्या ठिकाणी चीनच्या काही नागरिकांनी 2000 एकर शेत जमीन खरेदी केली आहे त्यापासून काहीच अंतरावर अमेरिकेचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र आहे.
त्यामुळे हेरगिरीच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारे शेत जमिनीची खरेदी केली जाऊ शकते दुसरे कारण म्हणजे चीनच्या संपूर्ण लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्याचे काम स्वतः चीन करू शकत नाही त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होऊ शकत नाही पण चीनने अमेरिकेसह ज्या देशांमध्ये शेतजमीन खरेदी केली आहे त्या ठिकाणी घेण्यात येणारी पिके चिनलाच विकली जातात त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार चीनची धान्याची गरज आहे त्यापैकी 20% गरज ही परदेशातील शेतजमीनच भागवते अनेक वर्षापासून सुरू असलेल्या चीनच्या या रणनीतीची दखल जगातील सर्वच देशांनी आता घेतली आहे.