नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत चीनने काश्मिरचा मुद्दा उपस्थित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. मात्र अन्य देशांनी त्याला विरोध केल्याने तो हाणून पाडण्यात आला.
फ्रान्सच्या राजनैतिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत काश्मिरचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व राष्ट्रांच्या विरोधामुळे तो फेटाळला गेला. अफ्रिकन देशांच्या मुद्द्यावर या बंद दाराआड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ऐनवेळेचा मुद्दा म्हणून चीनने काश्मिरचा प्रश्न उपस्थित केला.
गेल्या महिन्यातही अमेरिका, इंग्लंड आणि रशीया यांनी चीनचा काश्मिरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.