China Earthquake : चीनच्या वायव्येकडील गान्सू आणि किंघाई प्रांतात सोमवारी (18 डिसेंबर) रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 होती. वृत्तानुसार, पाकिस्तानपर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवले.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे मृतांची संख्या 111 च्या पुढे गेली आहे. वृत्तानुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे गांसू आणि किंघाई प्रांतात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून १२४ जण जखमी झाले आहेत.
चीनचे अधिकृत वृत्त माध्यम ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूकंपाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार, पीडित लोकांचे योग्य पुनर्वसन आणि मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्यांसह लोकांची सुरक्षित सुटका करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
An earthquake in Gansu province in northwestern China killed 86 people, Xinhua reports.
Another 96 people were injured.
Video:🟩 RT pic.twitter.com/6KrgCIJbkr
— Global Monitor (@Alanko344) December 18, 2023
सिन्हुआने या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे अनेक घरे कोसळली आहेत. याशिवाय अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर धावू लागले. चीनच्या गान्सू आणि किंघाई प्रांतात सोमवारी झालेल्या जोरदार भूकंपानंतर मंगळवारी (19 डिसेंबर) पहाटेपर्यंत बचावकार्य सुरूच होते.
भूकंपाची तीव्रता यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने 5.9 आणि शिन्हुआने 6.2 मोजली आहे. किंघाई प्रांताच्या सीमेजवळ असलेल्या गांसू प्रांतात असलेल्या, भूकंपामुळे काही स्थानिक गावांमध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पडलेल्या छत आणि इतर ढिगारा दिसत आहेत.
USGS नुसार, सोमवारी स्थानिक वेळेनुसार 11:59 वाजता 10 किलोमीटर खोलीवर भूकंप झाला, सुरुवातीला 6.2 तीव्रतेचा हादरा नोंदवला गेला. भूकंपानंतर अधिकार्यांनी ताबडतोब आपत्कालीन प्रतिसाद सुरू केला आणि भूकंपग्रस्त भागात बचाव कर्मचार्यांना पाठवले असल्याचे सिन्हुआने सांगितले. यूएसजीएसच्या अहवालानुसार, गान्सू प्रांताची राजधानी लान्झोऊच्या नैऋत्येला सुमारे 100 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर अनेक छोटे धक्के बसले. चीनमध्ये भूकंप हा असामान्य नाही. यापूर्वी ऑगस्टमध्ये पूर्व चीनमध्ये ५.४ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप जाणवला होता. ज्यामध्ये 23 लोक जखमी झाले असून डझनभर इमारती कोसळल्या आहेत.