मॉस्को – रशियाच्या दक्षिणेकडील कॅप्सियन किनाऱ्याजवळ सुमारे 1,700 सील मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. (1,700 dead seals found on Russia’s Caspian coast) हे सील कोणत्या कारणामुळे मरण पावले असावेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हे सर्व सील नैसर्गिक कारणामळेच मरण पावले असावेत असा वाटत असल्याचे रशियातील दागेस्तान प्रांताच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शनिवारी या किनाऱ्यावर 700 सील मरण पावलेले आढळलेले होते. मात्र किनाऱ्याचे व्यापक सर्वेक्षण केल्यावर एकूण 1,700 सील मरण पावल्याचे आढळून आले आहे. फेडरल फिशरीज एजन्सीच्या तज्ज्ञांनी या मृत सीलचा डाटा गोळा केला असून तपासणीसाठी नमुने प्रयोगशालेकडे पाठवून दिले आहेत.
Samruddhi Mahamarg : राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे
प्राथमिक तपासणीमध्ये कोणत्याही विषारी घटकामुळे अथवा दूषित अन्नपदार्थामुळे या सीलचा मृत्यू झाला असल्याची चिन्हे आढळलेली नाहीत. यापूर्वीही इतक्या मोठ्या संख्येने सील मरण पावल्याचे आढळून आले होते.