महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून आपल्याला पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. त्यांनी मातृभूमीसाठी लढताना पराकोटीचा स्वाभीमान जपला. त्यासाठी प्राणही पणाला लावले. त्यांचा हा पराक्रम आजच्या घडीला निश्चितच प्रेरणादायी आहे. या महान योद्ध्याला शतशः नमन.

Leave A Reply

Your email address will not be published.