मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. त्यातच काल विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याअगोदर एक घटना घडली ज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित विधानभवनात दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
अधिवेशनाच्या आज दिवसाची सुरुवात या घटनेने झाली. दोन्ही नेते एकत्र हसतमुखाने एकमेकांशी बोलत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या सर्वात राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या ऑफरच देऊन टाकली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले,’उद्धवजी तुम्ही अजूनही शांततेने विचार करा, आपल्याला झाड वाढवायचे आहे. त्याला खत द्यावे लागेल, तुम्ही काय घाबरताय म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ऑफर दिली.’
दरम्यान, येत्या शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आजही विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.