अभिनेत्री हुमा कुरेशी नव्या रूपात नव्या वेब सीरिजमधून भेटीला येत आहे. सोनी लिव्हवरील सिरीज “महाराणी’साठी हुमा कुरेशीने एक नवीन लुक धारण केला आहे.
सोनी लिव्ह 28 मे रोजी बहुप्रतिक्षित सिरीज “महाराणी’ सुरू होणार आहे. याच्या ट्रेलरमध्ये हुमाचा मुख्यमंत्री लुक दिसत आहे.
View this post on Instagram
हुमा कुरेशी म्हणाली, ट्रेलरला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मला खात्री आहे की या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल. राणी भारतीची भूमिका बहुआयामी आहे.
या भूमिकेमध्ये विविध छटा सामावलेल्या आहेत. करण शर्मा यांचे दिग्दर्शन आणि सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्या या शोमध्ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार प्रमुख भूमिकेत आहेत. नरेन कुमार व डिम्पल खारबंदा यांची निर्मिती असलेली ही काल्पनिक सीरिज आहे.