बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्पष्टवक्ते अभिनेत्रींपैकी एक नीना गुप्ता तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत नीना नेहमीच चर्चेत असते.
नीना गुप्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. नीना बॉलिवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सक्रिय आहेत. नीना गुप्ता लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे ज्यात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. ती आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच, नीनाने तिच्या पहिल्या किसिंग सीनशी संबंधित तिचा अनुभव शेअर केला आहे.
नीना टीव्हीवर पहिल्यांदाच किसिंग सीनच्या शूट करणार होती, या मालिकेतून भारतातील टेलिव्हिजनवरचा पहिला किसींग सीन दाखवण्यात येणार होता. त्यावेळी तो सीन करायचं समजल्यानंतर मी रात्रभर झोपले नव्हते. कारण मी आणि दिलीप धवन एकमेकांचे चांगले मित्रही नव्हतो. फक्त आम्ही सोबत काम करायचो. ते दिसायलाही चांगले होते पण या गोष्टीचा मला फरक पडत नव्हता पण हा सीन करण्यासाठी मी शारिरीक आणि मानसिकरीत्या तयार नव्हते. अभिनेत्री पुढे म्हणते की शूटिंग संपल्यानंतर मी रात्रभर डेटॉलने तोंड धुतले. मात्र, प्रेक्षकांनी या सीनला विरोध केल्यामुळे तो हटवण्यात आला.
नीना गुप्ता पुढे सांगते की, तिच्या पहिल्या ऑन-स्क्रीन किसिंग भूमिकेपूर्वी आणि नंतर ती खूप तणावाखाली होती. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘दिल्लगी’ या शोमध्ये काम करत असताना तिला या गोष्टींमधून जावे लागले तेव्हा हा प्रकार घडला.