तेलंगणमध्ये 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख देणार

सिद्दीपेट (तेलंगण) – तेलंगणमधील 2000 कुटुबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. राव यांचे मूळ गाव असलेल्या सिद्दीपेट जिल्ह्यातल्या चिंतामडका या गावातील 2 हजार कुटुंबांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

“माझा जन्म सिद्दीपेट जिल्ह्यातल्या चिंतामडका गावामध्ये झाला आहे. त्या गावातील लोकांचे मी देणे लागतो आहे. तेलंगण सरकारकडून या गावातील प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचा निर्णय मी घेतला आहे. या 10 लाख रुपयांमधून हे गावकरी त्यांना पाहिजे ती गोष्ट खरेदी करू शकतात.’ असे राव म्हणाले. अपल्य मूळ गावातच आयोजित् एक कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

चिंतामडका गावातील लोक ट्रॅक्‍टर, शेतजमीन, शेतीस उपयोगी अवजारे आणि मशिन,. आदी गोष्टींची खरेदी या पैशांमधून करू शकणार आहेत. या सरकारी योजनेला लवकरच मंजूरीही दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यंनी संगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)