आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना मोठा झटका

अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यात आजही सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

जर कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही आरोपांविरोधात चौकशीसाठी कोणाला अटक केली असेल तर त्याची अटकपूर्व जामीन याचिका आपोआपच निष्प्रभ्र होऊन जाते, असे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटले आहे. तसेच जर आपल्याला जामीन हवा असेल तर त्यासाठी योग्य त्या न्यायालयात जावे, असा सल्लाही न्यायालयाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला.  आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडीदेखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते असे म्हटले जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×