राहुल गांधींचा काश्‍मीर दौऱ्यावर जाण्याचा निर्णय चुकीचा

मायावतींनी विरोधकांवर साधला निशाणा

लखनऊ : जम्मू काश्‍मीरमधून केंद्र सरकारदे कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी विरोध पक्षातील काही नेत्यांसह श्रीनगर दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या याच दौऱ्यावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी जोरदार टीका केली आहे. कोणताही विचार न करता काश्‍मीरला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्‍मीर दौऱ्यावर जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे केंद्र आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्याची संधी मिळाली असल्याचा आरोप मायावती यांनी केला.

मायावती यांनी बसपाने संसदेत कलम 370 हटवण्याला समर्थन दिले होते असे ट्विट करून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले होते. त्यामुळे ते जम्मू काश्‍मीर राज्याला कलम 370 लागू करण्याच्या समर्थनार्थ नव्हते. त्याचसाठी बसपाने संसदेत कलम 370 हटवण्याचे समर्थन केले होते.

देशात संविधान लागू झाल्यानंतर 70 वर्षाने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी वाट पाहणे योग्य राहील. कोर्टानेही काश्‍मीर मुद्द्यावर सरकारला वेळ द्यावा अस सांगितलं आहे. त्यामुळे यावर राजकारण करणे योग्य राहणार नाही असं मायावती यांनी सांगितले. काश्‍मीरमधील परिस्थिती पाहता अशावेळी कॉंग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांकडून काश्‍मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्‍मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं असा टोला मायावती यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×