लोणीकंद : देशभर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना मेरी मिट्टी मेरा देश या अभियानंतर्गत शिरूर हवेली भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्री क्षेत्र तुळापूर येथून मोठ्या उत्साहात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली.
पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे, शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद व महाराष्ट्र राज्य क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली ला सुरुवात झाली.
श्री क्षेत्र तुळापूर येथील संभाजी महाराज समाधी स्थळापासून सुरू झालेली तिरंगा रॅली फुलगाव, वढू खुर्द, लोणीकंद, पेरणे फाटा, कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापूर मार्गे तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या समाधी स्थळी रॅली चा समारोप झाला.
वाहन रॅलीमध्ये भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजामध्ये कार्यकर्ते हातात तिरंगा ध्वज घेऊन, ‘भारत माता की जय’, ‘वंदेमातरम्’ अशा घोषणांनी समाधी स्थळासह पुणे नगर रोड दुमदुमून गेला.
यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रवींद्र कंद, संचालक सुदर्शन चौधरी, तिरंगा रॅली चे संयोजक संदीप सातव, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश कुटे, भाजपा नेत्या जयश्री पलांडे, शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे,
घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक दादा पाटील फराटे, हवेली महिला अध्यक्षा पुनम चौधरी, शिरूर महिला अध्यक्षा वैजयंती चव्हाण शिरूर भाजपा सरचिटणीस संपत गव्हाणे, यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.