पुणे – महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या चेतक फेस्टिवल (सारंगखेडा) अंतर्गत स्टेट ईक्वेस्टेरीयन असोसिएशन व नंदुरबार डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय अश्वरोहण स्पर्धेत पुण्याच्या दिग्विजय हॉर्स रायडींग अकॅडमीच्या आर्य सागर विजापुरे (वय ७) याने तीन सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले आहे.
सर्वांत लहान वयात अशी कामगिरी करणारा १२ वयोगटाच्या आतील स्पर्धेतील पहिलाच खेळाडू आहे. सारंगखेडातील अश्वरोहण स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते.
२७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत स्पर्धा पार पडल्या. दिग्विजय अकॅडमीच्या गुणेश पुरंदरे व स्वप्नील साने यांनी आर्यला मार्गदर्शन केले.
आर्याला पोल बेंडिंग, शो जम्पिंग टॉप स्कोर, हॅक्स यामध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि ड्रेसेजमध्ये रोप्य पदक मिळाले आहे. आर्यने केलेल्या कामगिरीमुळे फेस्टिवल मध्ये तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.