पुणे – क्रीडाभारती संस्थेतर्फे पंधरा ऑगस्ट रोजी डॉ. हेडागेवार चषक जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पेरूगेट भावेस्कूल (सदाशिव पेठ) येथे सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने होणार असून सात फेऱ्या होणार आहेत. स्पर्धेसाठी खुला गट, 8, 10, 12, 14 व 16 वर्षाखालील मुले व मुली असे गट ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये निखिल दीक्षित, केवल निर्गुण, रवी बेहेरे, प्रकाश करमरकर आदी नामवंत खेळाडूंनी भाग घेतला आहे. प्रत्येक गटात पहिले पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी 21 हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 6-30 वाजता होईल.